समुद्रपूर: अंतरगाव येथे विष मुक्त आहार अभियानांतर्गत मगन संग्रहालयाच्या वतीने राबविण्यात आले किसान चावळी अभियान
गिरड मगन संग्रहालयाच्या वतीने किसान चावळी शेतकरी बैठक अभियान हाती घेतला असून या अभियानअंतर्गत अंतरगाव या गावात गुरुवारी २ मेला सायंकाळी ५ वाजता किसान चावळी शेतकरी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे, प्रगतिशील शेतकरी चक्रधर भगत, विष्णू बाम्रणवाडे,सुरेश सेलोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना विष मुक्त शेतपिक घेण्यासाठी जैविक शेती या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते.