आज दिनांक 18 जानेवारी 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील वडोद तांगडा येथील ज्ञानेश्वर दगडोबा भवर वय 35 वर्ष या तरुणाचा 4 दिवसापूर्वी अज्ञात वाहनाच्या धडकेत भीषण अपघात झाला होता यावेळी त्याच्या डोक्याला छातीला मार लागला होता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल केले होते,यावेळी एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान दिनांक 17 जानेवारी रोजी या तरुणाचा मृत्यू झाला आहे.