जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा होताच म्हसळा तालुक्यात अघोरी कृत्य करून निवडणूक जिंकण्याची तयारी जोरात होताना दिसत आहे. तालुक्यातील कोळे गावाचे माजी सरपंच तथा शिंदे गटाचे संपर्क प्रमुख अमोल पेंढारी यांच्या घरापासून काही अंतरावर जिवंत कोंबडा,मेलेला कोंबडा व तिरडी ठेऊन स्मशान पूजा केल्याचे आढळून आले. ही स्मशान पूजा राष्ट्रवादी पक्षाच्या गण अध्यक्ष सतीश शिगवण यांनी केल्याच्या त्यांनी आरोप केला, मात्र सतीश शिगवण यांनी हे आरोप फेटाळून लावले.