उदगीर: बनशेळकी येथे धम्म शिबिराचा रॅली काढून समारोप
Udgir, Latur | Jul 6, 2025 भारतीय बौद्ध महासभा लातूर पूर्व यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहा दिवसीय उपासिका धम्मशिबिराचा समारोप बनशेळकी येथे करण्यात आला बौद्ध उपासक उपासिका यांनी गावातील प्रमुख रस्त्याने शांती संदेश धम्म रॅली काढून समता बंधुता एकता सादर केले गावातील बसवेश्वर महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक अण्णाभाऊ साठे चौक येथे पुष्प हार घालून अभिवादन केले व एकतेचे दर्शन दाखवून दिले या कार्यक्रमांमध्ये युवकांनी सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडले