रत्नागिरी: स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाचा जिल्हा शासकीय रुग्णालय येथे शुभारंभ
स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान केवळ १५ दिवसापूर्वी न राबवता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वर्षभर राबवावा. आरोग्य विभागाने सर्व लाभ सर्व सुविधा या मोहिमेअंतर्गत महिलांना द्यावी. त्याबाबत गावागावातून जनजागृती करावी असे आव्हान करताना नर्सिंग कॉलेजच्या इमारतीसाठी आवश्यक असणाऱ्या १३ कोटी रुपयांचा निधी येत्या काही दिवसा शासनाकडून मंजूर करून आणला जाईल असे आश्वासन पालकमंत्री डॉक्टर उदय सामंत यांनी दिले.