चाकण परिसरातील कडाचीवाडी येथे आम्ही इथले भाई आहोत, तू या रस्त्याने कसाकाय चालला असे म्हणत एका तरुणाला आणि भांडण सोडवण्यासाठी आलेल्या मध्यस्थांना दगडाने मारहाण केल्याची घटना रविवारी (१८ जानेवारी) घडली.या प्रकरणात प्रविण विष्णू कुंभार (४८, बापदेव वस्ती, मेदनकरवाडी) यांनी दक्षिण चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.