दक्षिण सोलापूर: सीना नदीचे पाणी वाढल्यामुळे तेलगाव– कंदलगाव रस्ता अद्यापही बंदच...
सोलापूर तालुक्यातील सीना नदीला आलेल्या वाढीव पाण्यामुळे तेलगाव–कंदलगाव रस्ता वाहतुकीसाठी बंदच आहे. नदीचा प्रवाह ओसंडून रस्त्यावर आल्याने दोन्ही गावांतील संपर्क तुटला आहे. प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक बंद ठेवली असून, नदी परिसरात जाणे टाळावे असे आवाहन सोमवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. स्थानिकांना वळण मार्गाने प्रवास करावा लागत असल्याने नागरिक व शेतकरी वर्ग त्रस्त झाला आहे.