भारतीय मजदूर संघ जालना यांच्या वतीने नवीन कामगार कायद्याबाबत जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने देवगिरी नागरी पतसंस्था हॉल, जालना येथे जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होती. मंगळवार दि. 6 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील संघटित व असंघटित कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला एकूण 135 कामगारांनी हजेरी लावली असून त्यामध्ये 117 पुरुष व 18 महिला कामगारांचा समावेश होता. मेळाव्यात मार्गदर्शन उमेश विश्वाद यांनी केले.