आज सभागृहात अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करताना, बंजारा (लमाण) समाजाला अनुसूचित जमाती (ST प्रवर्गाच्या ) सर्व सवलती मिळाल्या पाहिजेत अशी आग्रही मागणी आमदार विजयसिंह पंडित यांनी केली. शासनाने हैदराबाद गॅझेटीअर अधिकृत स्वीकारले असल्यामुळे यातील नोंदीनुसार बंजारा (लमाण) समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करणे गरजेचे आहे. इतर राज्यांमध्ये या समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या सर्व सवलती मिळत आहेत. आज महाराष्ट्रातील सर्व बंजारा समाज एकमुखाने याबाबतची मागणी केली आहे