आज एकादशीनिमित्त पंढरीनाथाच्या कृपेने लाहमगे रिसॉर्टचे भव्य उद्घाटन ५ जानेवारी रोजी होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. बाळासाहेब आंबेडकर करतील, तर अध्यक्षस्थानी शेगाव संस्थानचे गजानन महाराज ट्रस्टचे अध्यक्ष राहतील. जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या प्रसंगी भोजनदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून पत्रकार, पोलीस दल आणि स्वातंत्र्यसैनिकांना २५ टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती सदानंद लाहमगे यांनी दिली.