ठाणे: शिळफाटा येथे पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडी
Thane, Thane | Jul 6, 2025 आज दिवसभरापासून ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्याचे परिणाम विविध ठिकाणी पाहायला मिळाले. आज दिनांक ६ जुलै रोजी सायंकाळी ७ च्या सुमारास मुसळधार पावसामुळे शिळफाटा येथे रस्त्यावर पाणी साचलेले पाहायला मिळाले. त्यामुळे या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी देखील झाली होती. साधारण २ ते ३ किलोमीटर पर्यंत ही वाहतूक कोंडी झाली होती. सदर ठिकाणी अनधिकृत बांधकाम आल्याने पाण्याचा निचारा होण्यासाठी जागा नाही. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा पाणी साचत आहे अस स्थानिक सांगतात.