परळी: नगर परिषद कार्यालय येथे मतदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सायकल रॅलीतून मतदार जनजागृती
Parli, Beed | Oct 19, 2024 परळी वैजनाथ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी आज परळी वैजनाथ शहरातून सायकल रॅली काढून मतदार जनजागृती करण्यात आली. शासकीय विश्रमागृह, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू करण्यात आलेल्या या सायकल रॅलीस निवडणूक निर्णय अधिकारी अरविंद लाटकर यांनी हिरवा झेंडा दाखवला. या सायकल रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.