बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात विशेष न्यायालयात आज स्पेशल पुरावे दाखल करण्यावर आरोपी वकिलांनी आक्षेप घेतला. अभियोग पक्षाने अतिरिक्त पुरावे देण्याचा दावा केला. कोर्टाने चार्ज फ्रेमसाठी आग्रह दाखवला तरी दोन्ही अर्ज 19 डिसेंबरला निर्णयासाठी राखीव ठेवले. आरोपींनी मागितलेला लॅपटॉप फॉरेन्सिक विभागाकडे असल्याने देता आला नाही. अडीच तास युक्तिवादानंतर पुढील सुनावणी 19 डिसेंबरला होणार असल्याची माहिती वकील कोल्हे यांनी दिली.