हिंगणघाट नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या उपस्थितीत सर्व विभाग प्रमुखांसह आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीला आमदार समिर कुणावार,नगराध्यक्षा . नयना तुळसकर, मुख्याधिकारी प्रशांतजी उरकुडे तसेच नगरपरिषदेच्या विविध विभागांचे अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.बैठकीत शहरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते व नाले, आरोग्य सेवा, वीज, नागरी सुविधा, आदी विषयांवर चर्चा करण्यात आली