इचलकरंजी शहरातील गणेशनगर परिसरात एका तरुणास जीबीएस सदृश्य आजाराची लागण झाली आहे.त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून भागातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेत तातडीने भागात सर्व्हे करण्यासह प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली.त्यावर प्रशासनाच्या वतीने परिसरात उपाययोजना केल्या जात आहेत.