नांदुरा: अवैध गौण खनिजची वाहतूक करणाऱ्या चार टिप्परवर महसूल विभागाची कारवाई
गौण खनिज माती व रेतीची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या चार टिप्परवर महसूल विभागाने २१ व २२ नोव्हें.रोजी करवाई केली.गौण खनिज मातीची अवैध वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रक एमएच १९-सीएक्स महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त करून २१ नोव्हें. तहसील कार्यालयावर आणला होता.दरम्यान,वजन करण्याकरिता जात असताना चालक ट्रक घेऊन पळून गेला.याबाबत महसूल अधिकारी दिलीप जाधव यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी २१ नोव्हें.ला रात्री भा.न्या.संहिता ३०३(२),२२१, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम ४८ नुसार गुन्हा दाखल केला.