फिर्यादी रुपेश अजबराव पारटकर यांच्या तक्रारीनुसार 12 डिसेंबरला फिर्यादी हे आपल्या मित्रासह पान खान्याकरिता गेले असता आरोपी सोनू उदार याने फिर्यादीच्या जवळ येऊन विनाकारण फिर्यादीच्या डोळ्यावर बुक्की मारल्याने फिर्यादीने जाब विचारला असता आरोपीने हातातील गोट्याने मारहाण करून फिर्यादीस जखमी केले. याप्रकरणी 13 डिसेंबरला घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.