परभणी जिल्ह्यासाठी पुरवठा करण्यात आलेला अंदाजे २५० बॅग युरिया खत अनधिकृतपणे जालना जिल्ह्याकडे वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्याने जिल्हा कृषी विभागाच्या भरारी पथकाने सोमवार ८ डिसेंबर रोजी दुपारी कारवाई करत पाथरी तालुक्यातील वडी परिसरात एमएच ४६एफ २३८८ क्रमांकाचा ट्रक जप्त केला. या प्रकरणी कृषी अधिकारी तथा खते निरीक्षक सुधाकर फुलपगार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रक चालक आणि कृषी केंद्र मालक यांच्या विरोधात पाथरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.