शिरसगावबंड येथील संत मारुती महाराज व संत गाडगे महाराज मंदिराचे मागील भागात अतिक्रमण करून अडचण निर्माण केल्याने अतिक्रमण काढण्याची मागणी घेऊन शिरसगावबंड येथील नागरिकांनी दिनांक एक मे ला सकाळी 11 वाजता पासून चांदूरबाजार पंचायतसमिती समोर अन्नत्यागआंदोलनाला सुरुवात केली आहे. आज दिनांक दोन मे ला दुपारी एक वाजता आंदोलकांनी माहिती देताना सांगितले की या अतिक्रमणामुळे मंदिरातील सामूहिक कार्यक्रमालाअडचण निर्माणझालीअसून, या बांधकामाला परवानगी देणाऱ्या ग्रामसेवकावर देखील कारवाईची मागणी करण्यात आली