दारव्हा: गणित संबोध परीक्षेत श्री पुरुषोत्तमदास टंडन शाळा दारव्हा तालुक्यातून प्रथम
यवतमाळ जिल्हा गणित अध्यापक मंडळ व शिक्षण विभाग, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ सप्टेंबर रोजी संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात इयत्ता ५ वी ते ९ वी साठी गणित संबोध परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत दारव्हा येथील श्री पुरुषोत्तमदास टंडन उच्च प्राथमिक मराठी शाळेने उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.या यशाच्या गौरवार्थ दि. २२ डिसेंबर रोजी थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यआला