वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिवणी पारधी बेड्यावर गावठी मोहा दारू गाळपाना विरोधात धडक कारवाई करीत तब्बल ३० लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करून जागीच नष्ट केला. मौजा शिवणी पारधीबेडा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून याठिकाणी झाडा झुडपात जमिनीत लपवून ठेवलेला २६ हजार ५०० लिटर मोहा सडवा रसायन, ६३० लिटर गावठी मोहा दारू तसेच दारूनिर्मितीसाठी वापरण्यात येणारे भट्टी साहित्य असा एकूण अंदाजे ३० लाख ६९ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला.