संगमेश्वर: आंबा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक ठप्प
आंबा घाटात सोमवारी पुन्हा एकदा दरड कोसळल्याने मिऱ्या नागपूर महामार्गावरील वाहतूक थांबली आहे. सोमवारी सकाळी या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असताना ही घटना घडली असून, घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी ठेकेदार कंपनी रवी इन्फ्राकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. काही वेळातच वाहतूक पूर्ववत होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे आंबा घाटात दरडी कोसळण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.