आज दिनाक 19 डिसेंबर रोजी दुपारी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात नायलॉन मांजा विक्रीसाठी बाळगणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. जालन्याच्या चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत नायलॉन मांजाचे तब्बल 55 बंडल जप्त करण्यात आले आहेत. पतंग उडविताना नायलॉन मांजाच्या वापरामुळे मोटारसायकल चालकांना होणाऱ्या दुखापती, त्यातून होणारे मृत्यू तसेच पक्ष्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या दुष्परिणामांबाबत जालना पोलीस दलाकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात