नांदुरा: अलमपूर येथील ४७ वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथील एका ४७ वर्षीय इसमाने बाळू बढे यांच्या शेतातील धुऱ्यावरील निंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज 25 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे चार वाजता पूर्वी घडली. कृष्णा लक्ष्मण भोंबे वय ४७ वर्ष राहणार अलमपूर ता.नांदुरा जि.बुलढाणा असे मृतकाचे नाव आहे. याबाबत त्यांचा मुलगा प्रधुम कृष्णा भोंबे वय २२ वर्षे यांनी नांदुरा पोलिसात घटनेची माहिती दिली.दिलेल्या माहितीनुसार नांदुरा पोलिसात कलम 194 बी.एन. एस.एस.अंतर्गत मर्ग दाखल केला आहे.