घाटंजी: सोनखास येथे शुल्लक कारणातून कुऱ्हाडीने मारहाण,आरोपी विरुद्ध पारवा पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी स्वामी मॅकलवार यांच्या तक्रारीनुसार चार जानेवारीला साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी दीपक भवरे व आणखी तीन अशा चौघांनी फिर्यादीस तू रात्री माझ्या भावाच्या घराकडे का आला या कारणातून वाद करून कुऱ्हाडीने फिर्यादीच्या डोक्यावर तसेच काठीने व दगडाने मारहाण करून जखमी केले व शिवीगाळ करून जीवाने ठार मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी 4 जानेवारीला दुपारी अंदाजे एक वाजताच्या सुमारास पारवा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.