नांदुरा: चांदुर बिस्वा येथे वरली-मटका जुगाऱ्यावर कारवाई
चांदुर बिस्वा येथील गुजरी चौकात पैशाच्या हारजितवर सुरु असलेल्या वरली मटका जुगारावर नांदुरा पोलिसांनी धाड टाकुन एका जुगाऱ्यावर १९ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता कारवाई केलीय.चांदुर बिस्वा येथील गुजरी चौकात पैशाच्या हारजितवर वरली मटका जुगार सुरु असल्याची माहिती नांदुरा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे १९ नोव्हेंबरच्या सायंकाळी पोलिसांनी पंचासमक्ष या ठिकाणी धाड टाकली.