विधानसभेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे म्हणाले की, “काल रात्री आमच्या बीड जिल्ह्यामध्ये धारूर तालुक्यात, माजलगाव ते धारूर या प्रवासादरम्यान प्रसिद्ध वकील आणि ओबीसी समाजाचे नेते व आरक्षणाचे अभ्यासक अॅड मंगेश ससाणे यांच्या वाहनावर मध्यरात्री हल्ला घडवून आणला. याआधी लक्ष्मण हाके यांचा सहकारी असलेला पवन करवर याच्यावर माजलगाव तालुक्यात एका हॉटेलमध्ये जीवघेणा हल्ला झाला. अनेकांनी झुंड करून त्याचे हातपाय तोडले, आजही तो व्यवस्थित चालू शकत नाही.