जालना शहरातील गुन्हेगारी थांबता थांबेना झाली, पोलीसांना चॅलेंज देत जनू काही गुन्हेगार आपले गुन्हे करीत आहेत. पोलीसांचा धाक नसल्यागत गुन्हेगारी घटना घडत असल्याने शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जालना शहरातील छत्रपती संभाजीनगर मुख्य मार्गावर असलेल्या विशाल कॉर्नर परिसरात बुधवार दि.28 जानेवारी 2026 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एका 23 वर्षीय तरुणावर अज्ञात दोन हल्लेखोरांनी चाकूने सपासप वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली.घटना भरदिवसा घडल्याने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाली.