जालन्यात राजुर रोडवर अवैध गुटख्यावर चंदनझिरा पोलिसांची मोठी कारवाई.. प्रतिबंधित गुटखा व वाहनासह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघे ताब्यात.. आज दिनांक 20 शनिवार रोजी दुपारी तीन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात अवैधपणे विक्रीसाठी आणण्यात आलेला प्रतिबंधित गुटखा जप्त करत चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत गुटखा व वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनासह सुमारे १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणात