नाशिक: लेह लडाख येथील राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट क्रीडा स्पर्धेत टेंडिंग प्रकारात नाशिकच्या हर्षवर्धन जोशीला सुवर्णपदक
Nashik, Nashik | Aug 6, 2025 लेह लडाख येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय पिंच्याक- सिल्याट फेडरेशन कप स्पर्धेत ज्युनिअर गटात नाशिकच्या हर्षवर्धन जोशी याला टेंडिंग खेळ प्रकारात सुवर्णपदक प्राप्त झाले असल्याची माहिती इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले व नागेश बनसोडे यांनी आज दि. ६ रोजी सायंकाळी पाच वाजता आडगाव नाशिक येथे दिली आहे. हर्षवर्धन जोशी यांच्या यशाबद्दल आडगाव नाशिक परिसरातून त्याच्यावर अभिनंदनच वर्षाव होत आहे.