दौंड: मुलगा झाला की आईचं बळजबरीने मुंडन,दौंडमधील रोटी मंदिरातली अनिष्ट प्रथा, रुपाली चाकणकरांची कडक ॲक्शन
पुण्याच्या दौंड तालुक्यातील रोटी येथील श्री रोटमलनाथ मंदिरात मुलगा झाल्यानंतर आईचे सक्तीने मुंडन करण्याची अनिष्ट, अमानवीय प्रथा सुरू असल्याबाबत आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे.यातून धार्मिक परंपरेच्या नावाखाली महिलांना विद्रूप करत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात येत आहे.अशा प्रथांना आळा घालण्यासाठी मंदिर प्रशासन आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश.