मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलीस ठाणे हद्दीतील मलिदा रस्त्यावर दि. 18 जानेवारी रोजी आंधळगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून दुचाकीने दारू तस्करी करणारा आरोपी रामेश्वर देशमुख रा. जांब, ता. मोहाडी याला ताब्यात घेत आरोपीच्या ताब्यातील 15 लिटर हातभट्टीची दारू व मोटरसायकल क्र.MH 36 AP 3696 असा एकूण 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी आरोपीविरुद्ध आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.