चाळीसगाव (प्रतिनिधी): तालुक्यातील पिंपरखेड येथील शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षाची मोठी भेट मिळाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रात्रीच्या वेळी शेतीला पाणी देण्याच्या त्रासातून शेतकऱ्यांची आता कायमची सुटका होणार आहे. पिंपरखेड येथे उभारण्यात आलेला ३ मेगावॅट क्षमतेचा सोलर पॉवर प्लांट २ जानेवारीपासून यशस्वीपणे कार्यान्वित झाला असून, यामुळे परिसरातील कृषी पंपांना आता दिवसा आणि अखंडित वीजपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.