नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कोंढाळी जवळ असलेल्या 'इकोनॉमिक एक्स्प्लोसिव्ह लिमिटेड' कंपनीत शुक्रवारी सकाळी एक भीषण अपघात घडला.कंपनीच्या आवारात सुरू असलेल्या बांधकामादरम्यान एका भरधाव ट्रेलरने चिरडल्यामुळे दोन मजुरांचा मृत्यू झाला. मृतकांमध्ये दिनेश श्रीराम खांबलकर आणि जुगल किशोर रहांगडाले यांचा समावेश आहे.कंपनीत सिव्हिल कामासाठी प्रीकास्ट साहित्य घेऊन जाणाऱ्या ट्रेलरचे ब्रेक फेल झाले. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याच्या कडेला काम करणारे मजूर ट्रेलरच्या खाली आले.