खरांगना बांगडापूर मार्गावर आज सकाळी पट्टेदार वाघाचे दर्शन झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे .. त्यामुळे हा विषय चर्चेचा झाला आहे यातलं खरं काय खोटं काय हे वनविभागाने पडताळून पाहण्याची गरज आहे चार चाकी वाहन आज सकाळी खरांगणा बांगडा पूर जंगल रस्त्याने जात असता हा वाघ मार्गक्रमण करीत असल्याचे आढळून आल्याने चार चाकी वाहन चालकाने हा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर टाकला.. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे...