वडवणी: ऊस दराचे आंदोलन पेटले; कवडगाव येथे शेतकऱ्यांनी टायर जाळून केले आंदोलन
Wadwani, Beed | Nov 23, 2025 वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आज रविवार, २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता जोरदार आंदोलन केले. शेतकऱ्यांनी रस्त्यावर टायर जाळून निदर्शने केली आणि सरकार तसेच कारखान्यांच्या संचालकांविरोधात घोषणाबाजी करत आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकरी सांगत होते की, ऊसाला योग्य भाव मिळत नाही. वाढता उत्पादन खर्च, कामगार मजुरी, खतांचे दर, तसेच शेतीवरील इतर खर्च यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामध्ये योग्य दर न मिळाल्याने परिस्थिती अधिकच कठीण झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.त्यामुळ