मोताळा: शहरातील स्टेट बँकेजवळ दुचाकीच्या डिक्कीतून १० हजार रुपये लंपास
मोताळा शहरातील स्टेट बँकेजवळ दुचाकीच्या डिक्कीतून चोरट्यांनी १० हजार रुपये लंपास केल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी घडली.याप्रकरणी वरुड येथील रमेश विश्वनाथ आमले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध बोराखेडी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केल्याची माहिती २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता पोलिस सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.