कळमनूरी: शिवनी बुद्रुक येथे शेत जमिनीच्या कारणावरून वाद, महिलेस शिवीगाळ करून मारहाण,पोलिसात चौघा जणावर गुन्हा दाखल .
कळमनुरी तालुक्यातील शिवनी बुद्रुक येथे शेत जमिनीच्या कारणावरून वाद होऊन एका महिलेस आरोपींतानी संगणमत करून जातिवाचक शिवीगाळ करून लाथा बुक्याने मारहाण केल्याप्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चार जणा विरुद्ध भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमा सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली आहे .याप्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार केंद्रे हे अधिक तपास करीत आहेत .