आर्णी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी उद्या दिनांक 21 डिसेंबर रोजी पार पडणार असून, त्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेतील अंतिम टप्पा असलेल्या मतमोजणीकडे उमेदवार, कार्यकर्ते तसेच नागरिकांचे लक्ष लागले आहे. मतमोजणीसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रावर सकाळपासूनच हालचालींना वेग येणार असून, मतमोजणी केंद्राची सुरक्षा व्यवस्था कडक ठेवण्यात आली आहे. पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही निरीक्षण, प्रवेश–निर्गमन नियंत्रण आदी उपाययोजना करण्यात आल्या आह