कराड: सातारा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपची तोफ सज्ज;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ३०नोव्हेंबरला कराड येथे जाहीर सभा
Karad, Satara | Nov 29, 2025 सातारा जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारदौऱ्यानंतर आता भाजपनेही जिल्ह्यावर लक्ष केंद्रीत करत आक्रमक मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर कराड आणि मलकापूर नगरपालिका निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कराड दौऱ्यावर येणार असून, रविवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी शहरातील दत्त चौकात दुपारी २ वाजता जाहीर सभा घेणार आहेत. भाजपच्यावतीने शनिवारी सायंकाळी सहा वाजता याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली.