चाळीसगाव (प्रतिनिधी): चाळीसगाव शहर व तालुक्यातील सर्व बजाज गॅस एजन्सीच्या ग्राहकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार, सर्व गॅस ग्राहकांनी आपले E-KYC (ई-केवायसी) वेळेत पूर्ण करणे बंधनकारक आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप हे काम केलेले नाही, त्यांचे गॅस कनेक्शन आणि सबसिडी खंडित होण्याची शक्यता आहे.