सडक अर्जुनी: जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येगाव-क्रीडांगणावर जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांची आकस्मिक भेट
जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा येगाव येथील क्रीडांगणावर आज जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी आकस्मिक भेट देऊन विद्यार्थ्यांचे मनोबल उंचावले. शाळेच्या खेळाच्या मैदानावर खो-खो आणि कबड्डीचे सराव सामने प्रत्यक्ष सुरू असताना त्यांनी शाळेच्या क्रीडांगणावर आकस्मिक भेट दिली. क्रीडांगणावर माननीय भेंडारकर यांचे सर्व शिक्षकांनी स्वागत केले. माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी प्रत्यक्ष खो - खो खेळाचे अवलोकन केले. खेळाडूंचे कौतुक करून शिक्षकांनी खेळाचे नियम व फाऊल वेळीच लक्षात आणून दिले