हिंगणघाट शहरातील यशवंतनगर निवासी राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे जेष्ठ स्वयंसेवक व वर्धा जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष तसेच जी बी एम एम मोहता कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य पांडुरंगपंत शंकरराव मुडे यांचे आज निधन झाले. ते 90 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, 2 मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे.वणा नदी तीरावरील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या निधनाने एक समाज सेवक गमावल्याच्या भावना व्यक्त करण्यात येत आहे.