तालुक्यातील साकरीटोला परिक्षेत्रात सध्या बिबट्याचा वावर बघावयास मिळत आहे काही दिवसांपूर्वी कुलरभट्टी भागात बिबट्या असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तत्परता दाखवून नवेगावबांध येथील वन्य प्राणी रेस्क्यू टीमच्या मदतीने बिबट्या पकडून त्याला सुरक्षितपणे नागपूर येथे पाठविले त्यानंतरही या भागातील सिंधीटोला सितेपार मार्गावर बिबट्याला पाहिले गेले आहे ज्यामुळे या भागात बिबट्याचा वावराचा ठाम पुरावा मिळाला आहे वनविभाग बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून