दारव्हा: नगरपरिषद निवडणुकीतुन दोन उमेदवारांची माघार
दारव्हा नगरपरिषद निवडणुकीला बारा दिवस शिल्लक असताना दिनांक 20 नोव्हेंबरला दोन उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली.दि. २१ नोव्हेंबर उमेदवारी मागे घेण्याचा शेवटला दिवस असून अनेक जण राजकीय समीकरण जुळवून मत विभागणी होऊ शकते अशा उमेदवारांकडे उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मनधरणी करत असल्याचे दिसत आहे. गुरुवारला प्रभाग क्रमांक ७ (ब) मधून अपक्ष उमेदवार मनाली गौतम मुथा यांनी तसेच प्रभाग ८ (ब) मधून निमकर वैभव जिनेंद्र यांनी माघार घेतली