नेवासा नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या आज शनिवार २० डिसेंबर रोजी अत्यंत उत्साहात मतदान पार पडले. नगराध्यक्ष आणि १७ नगरसेवक अशा एकूण १८ जागांसाठी एकूण १८७१२ मतदारांपैकी १४६०८ मतदारांना हक्क बजावला आहे.तर रात्री उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती, सरासरी ७८.०६ टक्के मतदान झाले.