कन्नड तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा दिगांव खेडी येथे आयोजित सर्कल मेळावा उत्साहात पार पडला. कडाक्याच्या थंडीमध्येही रात्री उशिरापर्यंत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.यावेळी बोलताना जाधव यांनी निधीअभावी शासनाची अनेक विकासकामे रखडल्याने जनता त्रस्त असल्याचे सांगितले.घरकुल लाभार्थ्यांचे हप्ते तसेच विहीर व गाय गोठ्याचे अनुदान थकीत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी नमूद केले.