कोपरगाव: गोदावरी कालव्यांना ओव्हरफ्लोचे पाणी सोडावे, आ.काळेंची जलसंपदा मंत्री ना.विखेंकडे मागणी
चालूवर्षी मे महिन्यात पावसाने सर्वत्र जोरदार हजेरी लावल्यामुळे व हवामान विभागाने देखील भरपूर पर्जन्यमान होणार असल्याचा अंदाज दिल्यामुळे कोपरगाव मतदार संघातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात खरीप पिकांच्या पेरण्या केल्या आहेत. परंतु जून महिन्यात अपेक्षित पर्जन्यमान झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून गोदावरी कालव्यांना तातडीने ओव्हर फ्लोचे पाणी सोडावे अशी मागणी आज दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी 5 वा.आ. आशुतोष काळे यांनी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे यांच्याकडे केली आहे.