एका ट्रॅक्टर चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून शेतातील महावितरणच्या सिमेंटच्या विद्युत खांबास धडक देऊन चार खांब पाडल्याची घटना गोरेवाडी येथे घडली. याप्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, किल्लारी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गोरेवाडी शिवारात ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर (एमएच २४, एस ५२५८) चालकाने आपल्या ताब्यातील वाहन हयगयीने व निष्काळजीपणे चालविले. त्यामुळे महावितरणच्या विद्युत खांबास धडक बसली. त्यात ५० हजारांचे नुकसान झाले आहे.