चाळीसगाव (प्रतिनिधी): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन करण्याचा अधिकृत समावेश करावा, अशी मागणी चाळीसगाव येथील जागरूक नागरिकांनी एका स्मरणपत्राद्वारे नगरपालिका प्रशासनाकडे केली आहे.